मालवण कुडाळ मतदार संघात शिवसेना-भाजप युतीचाच विजय निश्चित…

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विश्वास: राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास..

⚡मालवण ता.२५-:
मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात आगामी २०२४ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे. यात महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा ठाम विश्वास शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण कुडाळचे पदाधिकारी बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास होत आहे. मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघात भाजप शिवसेना पदाधिकारी समन्वयातून काम करत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा विकासनिधी शासनाच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आचरा व अन्य ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने महाविकास आघाडीचा पराभव करत यश प्राप्त केले. आगामी सर्व निवडणुकीत विजयाचे हेच चित्र सर्वत्र राहील, असे बबन शिंदे, राजा गांवकर व योगेश तुळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तसेच भाजप वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून भाजप शिवसेना युती उमेदवार निश्चित होईल. मात्र मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात युतीचाच विजय होईल. असा ठाम विश्वास बबन शिंदे, राजा गांवकर यांनी व्यक्त केला आहे. आम्ही मांडत असलेली भूमिका ही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशानुसार मांडतो. याच पद्धतीने अन्य पदाधिकारी यांनीही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पत्रकार परिषद घ्याव्यात, असेही बबन शिंदे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले आहे.

You cannot copy content of this page