⚡मालवण ता.२५-: मालवण तालुक्यातील साळकुंभा वाडी येथे दत्त जयंती निमित्त दि. २६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. पूजन, दुपारी १ वाजता महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. दत्त जन्म, रात्री ८ वा. स्थानिक भजने तसेच रात्री ९ वा. श्री भद्रकाली दशावतार नाट्यमंडळ पेंडूर यांचा ‘विधिलिखित’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
साळकुंभा येथे उद्या दत्त जयंती उत्सव…
