वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या दत्त मंदिरात दत्त याग संपन्न…

⚡मालवण ता.२५-: वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या श्री दत्त मंदिराच्या कलशारोहण समारंभानिमित्ताने आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात दत्त याग व इतर धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी दादा महाराज यांच्या बहुसंख्य भक्तगणांनी उपस्थिती दर्शवली. उद्या २६ डिसेंबर रोजी मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे.

वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा कलशारोहण समारंभ काल संपन्न झाला. उद्योजक डॉ. दिपक परब यांच्या हस्ते कलशाचे पूजन करून दादा महाराज यांचे नातू रामदास प्रभू यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. यानिमित्त आज सोमवार सकाळी श्री गुरुदेव दत्ताची आणि श्री संत दादा महाराज यांच्या समाधीची नित्यपूजा झाल्यावर दत्तयाग विधी संपन्न झाला. यानंतर आरती व धार्मिक विधी पार पडले. दुपारी भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री स्थानिक भजने सादर झाली. यावेळी डॉ. दिपक परब, रामदास प्रभू, नाना करमळकर, हनुमंत प्रभू, प्रमुख गावकरी श्री. सावंत, सरपंच सौ. संजना रेडकर, चंद्रकांत हडकर, समीर प्रभूचांदेरकर, मनिष राऊळगावकर, श्री. रेवंडकर यांच्यासह बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते.

उद्या मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी या मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता नित्यपूजा धार्मिक कार्यक्रम, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता भिक्षाफेरी, १० वाजता गादीवर भिक्षा घेणे, १०:३० वाजता कीर्तन, १२ वाजता दत्त जन्म, रात्री १ वाजता पालखी काढण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाना उपस्थित रहावे, असे आवाहन घाडीवाडी मित्रमंडळ वायंगणी व ओमसाई भजन मंडळ वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page