शाळांमध्ये आता कवायत प्रकार का होत नाहीत…?

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सवाल..

⚡कणकवली ता.२४-: काही वर्षे पुर्वी म्हणजेच साधारण मागील अंदाजे १० ते १५ वर्षे पुर्वीपर्यंत प्राथमिक शाळा वा माध्यमिक शाळांमध्ये सकाळच्या प्रहरी सर्वात प्रथम कवायत प्रकार अस्तित्वात होते,
तसेच सर्वच शाळांमध्ये नानाविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले जायचे, मग आता का होत नाही ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केला आहे.

कवायत, नानाविध प्रकारच्या स्पर्धां मुळे मुलांची जडणघडण होण्यास एक प्रकारे शिक्षकांना मदतच होत होती. मुलांमध्ये आपसुकच, एकप्रकारे नवचैतन्य निर्माण होत होते, त्याच्यांमध्ये कोणत्याही प्रसंगाशी लढण्यासाठीची नवऊर्जा निर्माण होत होती.मात्र आता मोबाईल अभ्यासमुळे छोट्या पासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वच मुले उदास, एकल कोंडी झाल्याचे दिसून येते.आणि या उदास पणातुन, एकल कोंडी पणातुनच, आज लहान, मोठी मुले आत्महत्ये सारखा मार्ग निवडताना दिसून येतात, या सर्व प्रकारांची संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन, पुन्हा नव्याने सर्व शाळांमध्ये कवायत, नानाविध प्रकारच्या स्पर्धा गावपातळी पासुनच सुरू कराव्यात.अन्यथा पालक वर्ग आक्रमक होऊन एके दिवशी, तीव्र आंदोलन करेल तरी त्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, वेळीच सावध व्हा असे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page