कळसुली येथील स्वामी समर्थ मठामध्ये दत्तजयंती उत्सव…

⚡कणकवली ता.२४-: प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली-घोटगे रोड येथील श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे मंगळवार 26 डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
सकाळी 7 वा. स्वामींची नित्य पूजा, 8.30 वा. दत्त अभिषेक, स. 10 वा. ह.भ.प चंद्रकांत चव्हाण यांचे कीर्तन, 11.30 वा. आरती, दु. 12 वा. महाप्रसाद, दु. 3 वा. स्थानिक भजन, सायं. 5 वा. दिंडी, 7.30 वा. महाआरती, रात्री 8 वा. फुगडी (महिला मंडळ कुडाळ), रात्री 10 वा. डबलबारी 20-20 सामना असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भक्तांनी दत्तजयंती उत्सवास उपस्थित राहून दर्शनाचा, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page