⚡कणकवली ता.२४-: विद्यार्थ्यांची चित्रशैली विकसित व्हावी आणि रंगरेषांच्या माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती तसेच सृजनशीलता अधिक समृद्ध व्हावी या उद्देशाने कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै.उमा काणेकर स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे शनिवार ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. खालील गटात विषयनिहाय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गट पहिला (पाचवी ते सहावी)
विषय: १)आईस्क्रीम विक्रेता २) जादूगार .गट दुसरा (सातवी ते आठवी) विषय: १)क्रिकेट २)संगीत कार्यक्रम. गट तिसरा (नववी ते दहावी) विषय: १)शाळेतील दृश्य २)देवळातील दृश्य .गट चौथा (अकरावी ते बारावी) विषय: १)गावची जत्रा २)आठवडा बाजार
खुला गट विषय: १)सोशल मिडियामध्ये गुरफटलेली तरुणाई २)प्राणी संग्रहालय
प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढून त्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जानेवारी महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
अधिक माहितीसाठी
महेश काणेकर-९४२२९६७५४७
राकेश काणेकर-८६९८८५२८१५
सर्व स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन ट्रस्टच्या कलाविषयक उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक, चित्रकार महेश काणेकर यांनी केले आहे .
