⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन आयोजित निमंत्रिताच्या साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी 19 वर्षाखालील मुले व मुली क्रिकेट संघ निवड चाचणी गुरुवार दिनांक 28-12-2023 रोजी जिमखाना मैदानावर मुलेसकाळी 9.00 वाजता* व मुली दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.
या निवड चाचणीसाठी 1 सप्टेंबर 2005 नंतर जन्मलेला व जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येणार आहे.
भाग घेऊ इच्छित खेळाडूंनी खेळाडूंनी पूर्ण गणवेशात उपस्थित राहून जन्मदाखला, आधारकार्ड व प्रवेश फी २०० रुपये सोबत घेऊन येणे गरजेची आहे.
याबाबतचे आवाहन जिल्ह्याचे चेअरमन श्री. गुरुनाथ चौडणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नंदू रेडकर (९४०३५५९८८४) व रघु धारणकर (९८९०८०२०९५) संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.
