नगरसेविका श्रेया गवंडे यांच्याकडून आयोजित आयुष्यमान भारत कार्ड शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.२४-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) च्या नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांनी २२ डिसेंबर २०२३ रोजी नाबरवाडी कुडाळ आणि २१ डिसेंबर २०२३ रोजी गोधडवाडी येथे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

नाबरवाडी आणि गोधडवाडी असे एकूण १४८ नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड काढण्यात आले. यासाठी नाबरवाडी व गोधडवाडी विभागाची आशा स्वयंसेविका दीपा राऊळ आणि आरोग्य विभाग कुडाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी तालुका परिवेक्षक रवी गावडे, विनया तावडे ,आरोग्य सेवक शुभम गरुड डेटा ऑपरेटर सागर पोळ , महादेव तेली आणि राजेश फाळके लोकांच्या सेवेसाठी हजर होते. नागरिकांनी हे शिबिर घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page