शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य संघटक पदी रुपेश पावसकर यांची वर्णी…

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांना फटका बसण्याची शक्यता

.

⚡कुडाळ ता.२३-: शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य संघटक पदी रुपेश पावसकर यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच प्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या शिफारशीनुसार रुपेश पावसकर यांच्याकडे शिवसेना मुख्य जिल्हा संघटक पदाची जबाबदारी दिली आहे. याबाबत (आज) शनिवारी रुपेश पावसकर यांचे शिवसेना पदाधिकारी सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, अरविंद करलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
रुपेश पावसकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असून याचा फायदा शिवसेना पक्षाला नक्कीच होईल. तसेच ग्रामीण भागात रुपेश पावसकर यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्ह्याची ही महत्वाची जबाबदारी सुपूर्द केली आहे. मुख्य म्हणजे रुपेश पावसकर यांच्या निवडीने विरोधी पक्षात एकच चर्चा सुरू झाली आहे. तर रुपेश पावसकर यांच्या निवडीने उबाठा गटाचे कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुपेश पावसकर यांचे कुडाळ तालुक्यात मोठे प्रस्थ असून यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाला कडवा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.
या निवडीनंतर रुपेश पावसकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करताना आपल्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करू, तसेच तळागाळात शिवसेना पक्ष भक्कम करणार, असल्याचे प्रतिपादन पावसकर यांनी केले.

You cannot copy content of this page