बांद्यात भाजपच्या वतीने २५ रोजी
रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे बांदा शहर भाजपच्या वतीने येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे सोमवार दिनांक २५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी गटवार रंगभरण व आठवी ते दहावी या गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कागद पुरवला जाईल विद्यार्थ्यांनी रंगसाहित्य सोबत आणावयाचे आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार असून या दिवशी नाताळ सणाच्या निमित्ताने सांताक्लाज कडून मुलांना खाऊचे वाटपही करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन बांदा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page