Headlines

मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य देऊन करण्यात आला सन्मान..

⚡सावंतवाडी ता.२३- : सहदेव राऊळ : बाल कला-क्रीडा महोत्सव २०२३-२४ अंतर्गत निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आला.


निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये यात कबड्डीमध्ये द्वितीय, खो-खो मध्ये प्रथम, लांब उडी – प्रथम , उंच उडी – द्वितीय , ५० मीटर धावणे – तृतीय , समूह नृत्य – प्रथम , खो खो (मुली) – प्रथम क्रमांक प्राप्त करत विद्यार्थ्यांनी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला‌. या सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ नार्वेकर, गटविस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, अष्टविनायक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, उपाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, खजिनदार संदेश सोनुर्लेकर, सल्लागार राजा राऊळ, निलेश चव्हाण, निलेश नाटेकर, प्रसन्न सोनुर्लेकर, शेखर राऊळ, उमेश कोंडये, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, क्रीडा प्रशिक्षक गजेंद्र गावडे, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, पालक व‌ सदस्या विशाली जाधव, प्रशांत लातये, पंढरीनाथ गावकर, माधवी शिरोडकर, गौरवी मेस्त्री, सारिका परब, रंजना राऊळ, उत्तम मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना तालुका स्तरावरील स्पर्धांसाठी मान्यवरांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, क्रीडा प्रशिक्षक गजेंद्र गावडे, शेखर राऊळ, आनंद राणे, नृत्य प्रशिक्षक सिया शिरोडकर, सुप्रिया नाईक (वेशभूषा), गणेश मेस्त्री, सुनील राऊळ, गोपाळ नार्वेकर, सिद्धेश तेंडोलकर, सिद्धी तेंडोलकर, भिसे काकी व तृप्ती राऊळ यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दुर्वा साळगावकर, राजा राऊळ, गोपाळ नार्वेकर, सीमा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश चव्हाण, उदय फेंद्रे, प्रसाद लुमाजी, पांडुरंग नाटेकर, निलेश नाटेकर, प्रथमेश खडपकर, अथर्व धुरी, शेखर राऊळ, उमेश कोंडये, प्रसन्न सोनुर्लेकर, आर्यन लोके, सिद्धेश फेंद्रे, रामा देवळी, मनीष नाटेकर, ज्ञानेश्वर राणे, सचिन सोनुर्लेकर, शेखर राऊळ, सचिन नाईक यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न सोनुर्लेकर यांनी तर आभार निलेश चव्हाण यांनी मानले.

You cannot copy content of this page