युवकांनी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा…

विजयकुमार वळजू:कणकवली कॉलेज एन. एस. एस. शिबिराचे वागदे येथे उद्घाटन..

⚡कणकवली ता.२३-: राष्ट्राच्या विकासामध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असते युवकांनी देश कार्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. युवकांनी स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करावे, श्रमाचे संस्कार अंगी बाळगावे आपल्या अवतीभवती असणाऱ्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आणि संसाधने विकसित करण्यासाठी काम करावे . असे मत शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली सचिव विजयकुमार वळजू यांनी व्यक्त केले.


कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते प्रसंगी व्यासपीठावर वागदे सरपंच
संदीप सावंत , प्राचार्य युवराज महालिंगे ,वागदे ग्रामपंचायत सदस्य दीपक कदम, सुनील गोसावी, सौ सुनिधी आर्डेकर, सौ. नीलम पालव, सौ. संजना गावडे, गोपुरी आश्रम वागदे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, कार्यक्रम अधिकारी सुरेश पाटील, सागर गावडे प्रा. अदिती मालपेकर, प्रा. पूजा मुंज उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच संदीप सावंत म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा केंद्र सरकार प्रणित जलसंधारण, जलसाक्षरता सारख्या प्रकल्पातील सहभाग उल्लेखनीय आहे. एन. एस. एस च्या माध्यमातून वागदेमध्ये जे कार्य चालू आहे ते कौतुकास्पद आहे असेच काम स्वयंसेवकांनी चालू ठेवावे असे आवाहन केले.
प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले,राष्ट्रीय सेवा योजना सारख्या उपक्रमातून समाजाभिमुख पिढी तयार होते ही शिबिरे समाज भावना निर्माण करतात त्यामधूनच जागरूक नागरिक तयार होतो. या कार्यक्रम प्रसंगी बाळू मेस्त्री म्हणाले,आज जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलबाला आहे. अशा युगात एन एस एस तर्फे जाती-धर्माच्या अस्मिता बाजूला ठेवून राष्ट्रप्रेम भावना वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. सुरेश पाटील त्यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका वैभवी महाडेश्वर हिने केले. कार्यक्रमाला 160 स्वयंसेवक उपस्थित होते. शेवटी प्रा. सागर गावडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page