साकेडी येथील उरुस प्रसंगी नासीर शेख यांचा राजेंद्र पेडणेकर यांनी केला सत्कार

⚡कणकवली,ता.२३-: साकेडी येथील हजरत दादा शाहवली अल्ला रहमुतुल्ला उरुसला भेट देत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी नासीर शेख यांचा सत्कार केला.

या उरुसला प्राचीन परंपरा आहे परंतु अजुनपर्यंत कव्वाली ठेवण्यात आली नव्हती. हे पहिलेच वर्ष असल्यामुळे या उरूसला कव्वाली ठेवण्यात आली.यावेळी माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, राजेंद्र पेडणेकर मित्र, शालेय मित्रमंडळ आणि ॐ नमो भगवते भालचंद्राय नमः मित्रमंडळ यांचे संस्थापक व सर्व सल्लागार यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी सर्व मंडळाचे सदस्य आणि सर्व मुस्लिम बांधव उपस्थितीत होते.
यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी सर्व सल्लागार व आधारस्तंभ यांच्या वतीने कव्वाल शाहीद अजमेरी ( अहमदनगर) यांनाही बक्षीसी देऊन गौरविले.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन इस्माईल शेख यांच्या पुढाकाराने होत असते.यावेळी अविनाश गावडे, तवसीक शेख, सईद काजी, इस्माईल शेख, सईद नाईक, मजिद शेख, राजु शेख, दिलदार शेख, कासम शेख, मुश्ताक काजी, हनिफ काजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

You cannot copy content of this page