सावंतवाडी येथे आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना विशेष कॅम्प मोहीम…

लाभार्थ्यांनी लवकर ई-कार्ड बनवून घ्या: मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे आवाहन..

सावंतवाडी ता.२२- : सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत नागरिकांच्या सोयीसाठी आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना मार्गदर्शन विशेष कॅम्प मोहीम सावंतवाडीत आयोजित करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या यादीमध्ये नांवे समाविष्ट असलेल्या नागरिकांनी लाभार्थ्यांनी याची नोंद घेऊन लवकरात लवकर ई-कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे यांनी केले आहे.

26 व 27 रोजी रोजी वि.स. खांडेकर हायस्कुल, 28 व 29 रोजी बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी तळमजला डॉ. हॉस्पीटल समोर, 1 व 2 जानेवारी रोजी सी.एल.सी सेंटर -वैश्यवाडा सावंतवाडी, 3 जानेवारी रोजी ऍंथोनी मोतेस डिकुन्हा झिरंग प्राथमिक शाळा, 04 व 05 जानेवारी रोजी नगरपरिषद कार्यालय, 8 जानेवारी रोजी शिल्पग्राम रेस्टॉरंट लगतच्या हॉलमध्ये, 9 व 10 जानेवारी रोजी आपला दवाखाना मिलाग्रीस जुने चर्च समोर, 11 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरीक सुविधा केंद्र सालईवाडा, 12, जानेवारी रोजी समाज मंदीरकडील बहुउ‌द्देशीय इमारत येथे आयोजित करण्यात आली आहेत. आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा असून ही योजना विमा आणि हमी तत्वावर राबविण्यात येते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड ( ई-कार्ड) असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा पुढच्या टप्प्यात सावंतवाडी शहरातील लाभार्थ्यांची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. आयुष्मान कार्ड नोंदणीकरीता लाभार्थ्यांनी आपल्या जवळील उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी व संजीवनी बालरुग्णालय, सालईवाडा तसेच मान्यताप्राप्त ‘आपले सरकार केंद्र, या ठिकाणी जाऊन ई-के.वाय.सी पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी आपले रेशनकार्ड, आधारकार्ड, तसेच आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.

You cannot copy content of this page