बबन साळगावकर: संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयात अर्ज दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील आंबोली घाटात चार वर्षात रस्त्यांसाठी 16 कोटी 65 लाख रुपये खर्च झाला. परंतु त्यात 16 रुपयाचे देखील काम दिसत नाही असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.दरम्यान या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या संदर्भात आम्ही पोलिसांकडे देखील तक्रार केली आहे, परंतु अद्याप देखील पोलिसांचा लेखी उत्तर मिळालं नसल्याने आम्ही याची वाट पाहून त्यांच्या उत्तरानंतर आम्ही न्यायला मध्ये या संदर्भात अर्ज दाखल करून या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.
