शिवाजी घोगळे;स्थानिकांनी सकाळच्या सत्रात भाडे तर परप्रांतीयांनी सायंकाळची भाडे मारावी….
⚡सावंतवाडी ता.०७-: सकाळचे भाडे स्थानिकांना द्यायच व सायंकाळी परप्रांतीयांनी घ्यायच असा एकमुखी ठराव आज येथे पार पडलेल्या परप्रांतीय व स्थानिकांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र जे परप्रांतीय बैठकीत उपस्थित असलेल्यांनाच हा निर्णय लागू असेल व अन्य परप्रांतियाविरुध्द आमचा संघर्ष चालूच राहील असे चालक-मालक संघटनेचे महाराष्ट्र संचालक शिवाजी घोगळे यांनी आज येथे दिली.
दरम्यान चारचाकी पुर्णपणे बंद करुन फक्त सहा चाकी टेम्पो परप्रांतीयांनी वापरावे असेही बैठकीत ठरले असूही श्री घोगळे यांनी सांगितले.श्री.घोगळे हे सावंतवाडीत पत्रकार परिषद बोलत होते.स्थानिक टेम्पो चालक-मालक आणि परप्रांतीय मुकादम यांच्यात वाद निर्माण झालेला,वाद अखेर मिटला
यावेळी घोगळे पुढे बोलतान म्हणाले की जी आज या बैठकीतला अनुपस्थित राहिले त्या ठेकेदारांनी सुद्धा आमच्या संघटनेत सहभाग होऊन जे काय मागे घडलं ते सर्व बसून मिटूया दरम्यान फक्त परप्रांतीय लोकांनी आपल्या स्वतःच्या गाड्या न वापरता आमच्या स्थानिक लोकांच्या गाड्या वापरावा ही प्रमुख भूमिका आज या बैठकीत घेण्यात आल्याचे देखील श्री घोगळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान काही परप्रांती लोकांकडून गाड्या जरी असल्या तरी त्या टॅक्स किंवा पेपर जरी अन लीगल असतील ते आम्ही पर्यावरण अधिकाऱ्यांना सांगून कारवाई करण्यास सांगू असे देखील श्री भोगळे यांनी यावेळी सांगितले दरम्यान यापुढे स्थानिक टेम्पो चालकांवर कोणत्याही अन्य होणार नाही अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील श्री भोगळे यांनी यावेळी दिला.
यावेळी बावतीस फर्नांडिस, शैलेश पै, नीरज देसाई,विशाल सावंत, देवा टेंमकर निखिल सावंत, राजू वाळके तसेच परप्रांतीय कृष्णा चव्हाण सुनील चव्हाण अनिल चव्हाण, आदी चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व परप्रांतीय ठेकेदार उपस्थित होते.
