सातार्डा येथील दुबईस्थित महिलेच्या घरात घरफोडी…

तब्बल साडेनऊ लाखाचा दस्तऐवज लंपास:सावंतवाडीत पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल*

सावंतवाडी : सातार्डा येथील दुबईस्थित असलेल्या एका महिलेच्या घरात घरफोडी करत तब्बल साडेनऊ लाखाचा दस्तऐवज लंपास झाल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे.

पावलीन झेपेरीन गिरकर ( ४०) असे संबंधित महिलेचे नाव आहे. हा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला आहे. मात्र ती आता आपल्या घरी आल्यावर तिच्या निदर्शनास आले आहे.या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page