राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पर्यटन महासंघाची भेट…

छत्रपतींना दिली मानवंदना: प्रशासनाकडून पर्यटन वाढीसाठी एखादं काम होणे गरजेचे…

मालवण दि प्रतिनिधी
चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथील शिवपुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर हा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असतानाच आज पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली येथील तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संघाच्यावतीने पर्यटन व्यावसायिकानी राजकोट किल्याला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली

यावेळी पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी गेली २५ वर्ष पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पर्यटन वाढीसाठी एखाद काम होणे गरजेचे होते. हा किल्ला पुनर्जिवीत केल्यानंतर तसेच याठिकाणी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्यानंतर इथल्या स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील साधारण २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी या किल्ल्याला भेट दिली. या सोहळ्याच्या निमित्ताने पर्यटनासाठी एक नवा राजमार्ग निर्माण झाला आहे तसेच पर्यटन व्यावसायिकांनी या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक दरवाजा तसेच इथल्या स्थानिक नागरिकांसाठी रोजगार निर्माण व्हावा यासाठी पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच शिवकालीन कल्चर काय हे पर्यटकांना समजण्यासाठी व अनुभवता यावे यासाठी सिंधुरत्न कलामांचाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा कार्यक्रम पर्यटन व्यावसायिकांच्या माध्यमातून सुरु करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मंगेश जावकर, दादा वेंगुर्लेकर, भूषण साटम, सहदेव साळगावकर, अभय पाटकर,राकेश कुंटे,मनोज खोबरेकर, गणेश पाडगावकर,अवी सामंत, प्रवीण रेवंडकर, रघुनाथ डीचवलकर, सुरेश बापार्डेकर, इमरान मुजावर, बबन रेडकर, प्रितम चिंदरकर, रवींद्र खानविलकर, निकिता पाटील, नसरीन डिंगणकर, प्रतिभा ढोके, विना पांचाळ, समिधा सकपाळ, सिमिता राऊळ, पूजा मेस्त्री, राजश्री बिले, अश्विनी जोशी, मनिष खोत, दर्शन वेंगुर्लेकर, ऐश्वर्य मांजरेकर, रसिका मुंबरकर तसेच मेढा राजकोट रहिवासी उपस्थित होते.

You cannot copy content of this page