⚡मालवण ता.०५-: वायंगणी ग्रामपंचायत व यारा फाउंडेशन तर्फे वायंगणी येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींना वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.
ग्रामपंचायत वायंगणी वतीने
महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात
मसाला प्रशिक्षण, मायक्रोन विणकाम
, लिक्विड फिनायल सोफ व गांडूळ खत बनविणे आदी बाबत तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी प्रत्येक बचत गटाला 10 कावेरी जातीच्या कोंबडी चे वाटप करण्यात आले.
