तर सचिवपदी सौ. अवंती पंडित यांची निवड:पदाधिकाऱ्यांचा
बुधवार ६ रोजी पदग्रहण सोहळा होणार संपन्न…
⚡बांदा ता.०४-: इनरव्हील क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी सौ. अर्चना पांगम तर सचिवपदी सौ. अवंती पंडित यांची निवड करण्यात आली आहे. क्लबच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक ६ रोजी सायंकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्ष सौ. वैशाली लोखंडे, जिल्हा पदाधिकारी सौ. उत्कर्षा पाटील, सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रिया रेडीज, कार्यवाह मीना जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बांदा इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्षपदी सौ. रुपाली शिरसाट, खजिनदारपदी सौ. श्वेता येडवे, एडिटर सौ. अक्षता साळगावकर, तर आयएसओ पदी सौ. निनता गोवेकर यांची निवड करण्यात आली आहे. पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा सौ. अर्चना पांगम यांनी केले आहे.
