Headlines

५१ व्या सांवतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलची उत्तुंग भरारी…

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती सावंतवाडी आयोजित ५१ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
२०२ ३ – २ ४ कलंबिस्त हायस्कूल सावंतवाडी येथे शनिवार
दि . ०२ डिसेंबर २०२३ व रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान विषय शिक्षिका श्रीम. शीतल शशिकांत मोरजकर यांच्या ‘ नेक्स्ट स्टेशन … स्पेस मिशन’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच विज्ञान प्रतिकृती माध्यमिक विद्यार्थी विभागात कु. नाजमीन संजय तडवी हिच्या ‘ झिरो वेस्टर ‘ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही प्रतिकृतींचे प्रदर्शन स्थळी उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी प्रशालेच्या विज्ञान विषयशिक्षिका श्रीम. शीतल मोरजकर व विद्यार्थिनी कु. नाजमीन तडवी यांचे अभिनंदन केले आहे .

You cannot copy content of this page