दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार गरजेचा…

डॉ. धनंजय रासम:वागदे गोपुरी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा..

⚡कणकवली ता.०४-: वागदे येथील गोपुरी आश्रम याठिकाणी एकता दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. धनंजय रासम, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिव सचिन सादिये, संगीता पाटील, गोपुरी आश्रमचे सचिव विनायक मेस्त्री, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, अशोक करंबेळकर, पत्रकार महेश सरनाईक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, कोरगावकर ट्रस्टच्या ट्रस्टी सुचित्रा कोरगावकर, तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, विनायक सापळे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, आर. के. पाटील, विलास गुडेकर, दीपक दळवी यांच्यासह एकता दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष सुनील सावंत, उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिव सचिन सादये, सदस्य दीपक दळवी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ. धनंजय रासम म्हणाले, दिव्यांग बांधव हा समाजातील एक घटक असून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आरोग्य सेवा देण्यात आपण सदैव तयार आहे. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सुचित्रा कोरगावकर म्हणाल्या, दिव्यांग व्यक्ती शरीराने कमकुवत असले तरी मनाने ते खूप प्रबळ आहे. दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कोल्हापूरमध्ये विविध संस्था कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी या संस्था काम करण्यास तयार आहेत. या संस्थांशी दिव्यांग बांधवांनी जोडून राहिले पाहिजे. दिव्यांगांना रोजगार उपलब्ध देणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राजेंद्र मुंबरकर, अशोक करंबेळकर, विनोद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तर संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केवळ संस्थेतील नव्हते तरसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बंधू -भागिनींच्या काय मागण्या आहेत, समस्या आहेत आणि त्या बाबत समाजात कशी जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे, अजून दिव्यांग व्यक्तींबाबत समाजात काय विचार आहेत याबाबत खंत व्यक्त केली. तर दिव्यांगांच्या उन्नतीसाठी एकजूट महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यात शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळत नाही. गेले काही महिने दिव्यांगांना पेन्शन वेळेत मिळत नाही म्हणून उपोषण करण्याचे ठरवले होते.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी तालुकास्तरावर होणारा दिव्यांगांचा मेळावा यापुढील काळात ग्रामपंचायतस्तरावर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एकता दिव्यांग संघ व गोपुरी आश्रमच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रमात दिव्यांगांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. सावंत बोलत होते.

You cannot copy content of this page