मडुरा जिल्हा परिषद प्रशालेच्या इमारतीसाठी २४ लाखांचा निधी मंजूर…

उपसरपंच बाळू गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन : विविध रस्त्यांसाठी लाखोंचा निधी..

⚡बांदा ता.०१-: मडुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ च्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उपसरपंच बाळू गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सर्वसाधारण विकास निधीतून या इमारतीसाठी २४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे प्रलंबित असलेली पालकांची मागणी पूर्ण झाली आहे.


यावेळी सरपंच उदय चिंदरकर, ग्रा. पं. सदस्य स्वप्नाली परब, रेश्मा परब, शिक्षक पालक संघाचे माजी अध्यक्ष मदन परब, पोलिस पाटील नितीन नाईक, श्रीकृष्ण भोगले, रमेश परब, कृष्णा परब, बाबली परब, बाबलो गुरव, पंढरी सातार्डेकर, मुख्याध्यापिका मंजिरी झेंडे आदी उपस्थित होते.
सदर प्रशालेची इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. प्रशालेच्या दोन वर्गखोल्यांसह किचन मध्ये वाळवीची वारुळे झाली होती. छप्परही धोकादायक बनले होते. त्यामुळे सदर प्रशाला खबरदारीचा उपाय म्हणून गेली पाच वर्षे निवडणुकांसाठी मतदान केंद्र म्हणून प्रशासनाने नाकारली होती. धोकादायक इमारत असतानाही विद्यार्थी मात्र प्रशालेत नाईलाजाने बसत होते. बऱ्याच पाठपुराव्यानंतर प्रशालेच्या इमारती साठी निधी मंजूर झाला आहे. तसेच मडूरा – सातार्डे मुख्य रस्ता ते केरकरवाडी रस्ता व रेडकरवाडी रस्त्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती यावेळी बाळू गावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page