⚡वेंगुर्ले ता.०१-: मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी वेंगुर्ल्यात आज ठिकठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा बांधव एकवटले. यावेळी मराठा नेते जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे…एक मराठा लाख मराठा..अशा घोषणा देत मराठा आरक्षण या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ वेंगुर्ला यांच्या वतीने आज १ डिसेंबर रोजी तालुक्यात शिरोडा, मोचेमाड, मातोंड, पेंडूर, तुळस, आसोली, वायंगणी, खानोली आदी ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. या उपोषणात अखिल भारतीय मराठा समाज वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सिद्धेश परब यांच्यासह ठिकठिकाणी मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.
