⚡बांदा ता.०१-: पिंगुळी येथील ग्लोबल फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेकडून मडुरा हायस्कूलमध्ये नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. यामध्ये ११२ मुलगे व १२४ मुली असे एकूण २३६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेत त्यांना संस्थेमार्फत चांगल्या दर्जाचा चष्मा मोफत देण्यात येणार आहे.
नेत्र तपासणीसाठी डॉ. तेली व डॉ. परब यांनी सहकार्य केले. संस्थेचे श्री. गावडे यांनी नियोजन पाहिले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुनील कांबळे यांनी स्वागत केले. सुरेश सावंत यांनी आभार मानले.
मडुरा हायस्कूलमध्ये नेत्र तपासणी शिबीर संपन्न…
