जावेद खतीब:सावंतवाडी आगार व्यवस्थापकांनकडे केली मागणी..
⚡बांदा ता.०१-: बांदा येथून वाफोली, बावळाट, दाणोली मार्गे आंबोली नियमित बस सेवा सुरू करावी अशी लेखी मागणी बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांना केली आहे. लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन एसटी प्रशासनाने दिल्याची माहिती श्री खतीब यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांदा (व्हाया) वाफोली, बावळाट, दाणोली मार्गे आंबोली नियमित बस सेवा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. सदरची बस सेवा नसल्याने रोजगारासाठी जे लोक गोवा येथे कामाला जातात त्यांना सावंतवाडी मार्गे बांद्यात यावे लागते. तसेच शाळकरी मुलेदेखील बांद्यात येतात. त्यांना बस सेवा नसल्याने पायपीठ करावी लागते. त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवेसाठी देखील बांदा गावातूनच गोवा राज्यात जावे लागते अशावेळी त्यांची गैरसोय होते.
बांदा ही बाजारपेठ देखील मोठी असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांची ये जा असते. या सर्व बाबींचा विचार करता सदरची बस सेवा तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.
