⚡बांदा ता.२३-: मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दत्ताराम सडेकर पुरस्कृत शालेय गटासाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी आठवी ते दहावी गट असून यासाठी ‘मोबाईल इंटरनेटचा अतिरेक नको रे बाबा..’, ‘भारताची ७५ वर्षातील वैज्ञानिक प्रगती’, ‘कोकणातील जैवविविधता आणि विकासाची संधी’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. निबंध लेखनासाठी १ तास वेळ असून शब्द मर्यादा ४०० ते ५०० शब्द आहे. एका प्रशाळेतून ४ स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २०० रुपये रोख, तसेच दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रोख १०० रुपये तसेच प्रशस्तीपत्र व ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी १ डिसेंबर पर्यंत ग्रंथपाल आनंद देवळी यांच्याशी संपर्क साधून नावानोंदणी करावी असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर व कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.
