असनिये येथील प्रस्तावित फोरजी टॉवरचे सरपंच रेश्मा सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन…

नेटवर्कचा दुष्काळ संपणार; ग्रामस्थांमधून समाधान

⚡सावंतवाडी ता.१८-: असनिये येथील प्रस्तावित बीएसएनएल फोरजी टॉवरचे आज सरपंच रेश्मा सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बीएसएनएलचे अधिकारी रमेश चौगुले ग्रामस्थ लक्ष्मण सावंत, राकेश सावंत, भरत सावंत, संदेश कोलते, संभाजी कोलते , दिपक सावंत, आनंद सावंत, अनिल सावंत, प्रशांत ठीकर , शशिकांत सावंत आदी उपस्थित होते असनिये सारख्या दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे मोबाईल टॉवरची मागणी सातत्याने कित्येक वर्षापासून ग्रामस्थांमधून केली जात होती मात्र सरपंच रेश्मा सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील मध्यवर्ती ठिकाणी प्रस्तावित टॉवरचे भूमिपूजन झाल्यामुळे गावातील नेटवर्कचा दुष्काळ कायमचा संपणार असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे

You cannot copy content of this page