हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर

⚡मालवण ता.१८-: महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या ६२ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे, तर १२ डिसेंबरपासून वेंगुर्लेच्या मधुसुदन कालेलकर बहुद्देशीय सभागृह येथे रोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना प्रारंभ होईल.

मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून येथील रंगकर्मी संजय शिंदे काम पाहत आहेत. सिंधुदुर्ग केंद्रावर नाट्यरसिकांसाठी १२, तर रत्नागिरी केंद्रावर एकूण ९ नाटकांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. जास्तीत जास्त नाट्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शासनाच्या कार्य संचालनालयाच्या संचालकांतर्फे सिंधुदुर्ग केंद्र समन्वयक संजय शिंदे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग केंद्रांतील मालवण व वेंगुर्ले येथे होणारी नाटके – मालवण : ७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, मालवण नाटक- ‘विठ्ठल विठ्ठल’ लेखक- गंगाराम गव्हाणकर दिग्दर्शक- रवींद्र देवधर, ८ रोजी अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली- ‘सुजाता मेली न्हाय,’ लेखक- प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक – विजय चव्हाण, ९ रोजी बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ – त्या तिघांची गोष्ट,’ लेखक डॉ. आनंद नाडकर्णी, दिग्दर्शक केदार सामंत. १० रोजी नागरिक बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठान, नेरुर-‘शाळा जि. प. पू. प्रा. लेखक व दिग्दर्शक- देवेंद्र गावडे. ११ रोजी हनुमान सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, देवबाग – ‘सुनबाई तोऱ्यात,’ गव्हाणकर, लेखक- गंगाराम दिग्दर्शक- बाबा कांदळगावकर. १७ रोजी स्वराध्या फाऊंडेशन, मालवण-‘माजार,’ लेखक-इरफान मुजावर, दिग्दर्शक- हेमंत कदम १८ रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली–‘कृष्णकिनारा,’ लेखक- रॉबीन लुपिस, दिग्दर्शक रघुनाथ कदम,

वेंगुर्ले :- मधुसुदन कालेलकर बहुद्देशीय सभागृह येथे होणारी नाटके- १२ डिसेंबर रोजी इंद्रधनू कलामंच, दापोलीचे ‘अशी पाखरे येती’, १३ रोजी जीवनदायी विकास संस्था, वेंगुर्लेचे ‘कालचक्र’, १४ रोजी कलावलय, वेंगुर्लेचे ‘सावरबेट’, १५ रोजी सिद्धांत फाऊंडेशन, पिंगुळीचे प्रिय पपा’, १६ रोजी महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय, परुळेचे ‘ती सात वर्षे’ लेखक- इरफान मुजावर, दिग्दर्शक- प्रथमेश नाईक.

8रत्नागिरी केंद्रावर होणारी नाटके – २५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण केंद्रावर ही स्पर्धा रंगणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडेचे ‘अशुद्ध बीजापोटी’ लेखक केदार देसाई, दिग्दर्शक प्रसाद थोपट २६ रोजी कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरीचे ‘कोमल गंधार,’ लेखक : डॉ. शंकर शेष दिग्दर्शक : संतोष सारंग. २७ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूणचे ‘परीघ, लेखक : आनंद खरबस दिग्दर्शक : अभिजीत काटदरे २८ रोजी राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरीचे ‘दॅट नाईट’, लेखक व दिग्दर्शक चंद्रशेखर मुळये २९ रोजी सहयोग रत्नागिरीचे ‘लॉलीपॉप’ लेखक चैतन्य सरदेशपांडे, दिग्दर्शक ओंकार रसाळ, गणेश राऊत, ३० रोजी संकल्प कलामंच, रत्नागिरीचे ‘वाटेला सोबत हवी’ लेखक गंगाराम गवाणकर, दिग्दर्शक चंद्रकांत कांबळे. १ डिसेंबर रोजी देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळ, जानशीचे ‘पूर्वझ’, लेखक व दिग्दर्शक : प्रसाद पंगेरकर. २ रोजी विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्था, रत्नागिरीचे ‘सात- बारा’, लेखक नीलेश जाधव, दिग्दर्शक : अमित इंदुलकर. ३ रोजी श्रीरंग, रत्नागिरीचे ‘तथास्तु’, लेखक : राजश्री माने, दिग्दर्शक : भाग्येश खरे.

You cannot copy content of this page