मंत्री दिपक केसरकर यांचे बॅनर फाडल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात…

काल घडला होता प्रकार; मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न..

⚡सावंतवाडी ता.१८-: दिवाळीनिमित्त शहरात लावण्यात आलेले मंत्री दिपक केसरकर यांचे बॅनर फाडल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत ताब्यात घेतले असता तो मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित मनोरुग्णाला ताब्यात घेऊन रत्नागिरीतील मेंटल हॉस्पिटलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळीनिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले होते. याबाबत केसरकर समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस ठाण्यात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती, दरम्यान याबाबत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करीत एकाला ताब्यात घेतले असता तो मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले, त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन रत्नागिरी येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये त्याची रवानगी केली आहे.

You cannot copy content of this page