आरक्षण न मिळालेल्या समाजाला विधेयक आणुन लोकप्रतिनिधींनी समंत करा…

राजू मसुरकर यांची मागणी:सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना हा प्रश्न मार्गी लावावा..

सावंतवाडी : महाराष्ट्रातील विविध
समाजातील जातीना आरक्षण न मिळालेल्या समाजाला लोकसभा व राज्यसभेमध्ये विधेयक आणुन लोकप्रतिनिधींनी देशांमध्ये विविध समाजाचे ऐक्य राहण्यासाठी संमत करा, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केली आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्व पक्षातील राजकीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन सर्व समाजातील व्यक्तींना आरक्षण देऊन देशाच्या हितासाठी तसेच देशाच्या सीमेवरती भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून या भारतभूमीचे सैनिक रक्षण करत आहेत त्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या समाजामध्ये द्वेषाची भावना होऊ नये म्हणून 50 टक्के वरुन 90 टक्के पर्यंत आरक्षण देऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना हा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहनही मसूरकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page