58 लाखाच्या दारूसह 69 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
⚡कणकवली. ०९-:
गोव्याहून मुंबईकडे अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असताना मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथे मध्यरात्री एक वाजता ही एलसीबी विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 58 लाखाच्या दारूसह 69 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या हाती ऐन दिवाळीच्या तोंडावर हे भले मोठे घबाड लागल्याने अवैध दारू वाहतूकदार यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथे मध्यरात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे ही चोरट्या दारूची वाहतूक केली जात होती.
गोव्यातून राज्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग एलसीबी विभाग सातत्याने दारू वाहतुकीवर छापे टाकून प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे. त्याच पद्धतीने वारगाव येथे पीएसआय आर.बी.शेळके, हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर यांना दारूची चोरटी वाहतूक एका ट्रकमधून होत असल्याचे कळल्यानंतर या दोघांनी वारगाव येथे आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला आणि 69 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेंद्र घाग, पीएसआय आर. बी.शेळके एएसआय गुरु कोयंडे, हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, आशिष जामदार, बसत्याव डिसोजा,श्री आरमारकर,बाळू पालकर ,श्री नार्वेकर यांच्या पथकाने ही केली.
यापुढे देखील अशी धडक कारवाई सुरू ठेवणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून देण्यात आली. या प्रकरणी संबंधित दारू वाहतूक दरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
