*युवक कॉंग्रेस विधानसभा उपाध्यक्ष पल्लवी तारी यांची कॅन्सरग्रस्त युवतीला आर्थिक मदत*

*💫मालवण दि.११-:* जागतिक महीला दिनाचे औचित्य साधत कुडाळ मालवण विधानसभा युवक काँग्रेस वतीने या विधानसभा क्षेत्रातील महिलांचा सन्मान करत महिला सन्मान सप्ताह साजरा करत असतानाच मालवण शहरातील हर्षदा तांडेल या कॅन्सरग्रस्त युवतीला युवक काँग्रेसच्या विधानसभा उपाध्यक्ष पल्लवी तारी यांच्या पुढाकाराने औषधोपचारासाठी रोख रक्कम स्वरूपात सुपूर्द करीत मदतीचा हात दिला आहे यावेळी युवक काँग्रेसचे प्रवक्ता अरविंद मोंडकर, जिल्हा चिटणीस बाळू अंधारी, देवानंद लुडबे, सरदार ताजर व इतर पदाधिकारी उपस्थित होते कॅन्सरग्रस्त हर्षदाला सद्या गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागत असून त्यात घरची परिस्थिती हलाखीची असतानाही वडिलांनी या लेकीला नवं जीवन पुन्हा मिळवून दिले या नंतर काही समाजसेवकानी या कुटुंबाला सहकार्याचा हात दिला आहे तरी अजून काही दानशूर व्यक्तींनी स्वतः पुढे येऊन हर्षदाला सहकार्य करावे असे आवाहन पल्लवी तारी यांनी केली आहे यावेळी हर्षदाच्या वडिलांनी तारी व सहकारी पदाधिकारी यांचे आभार मानले

You cannot copy content of this page