कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सव साध्यापद्धतीने साजरा

*💫देवगड दि.११-:* यावर्षी कोरोनाच्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सव यात्रा केवळ धार्मिक विधी व मोजक्याच भाविकांच्या साजरा करण्यात आला.दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा यात्रोत्सव यावर्षी मात्र कोरोनामुळे ग्रामस्तरावर सुरू झाल्याने कुणकेश्वर परिसर सुनासुना दिसत होता. कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली गुरूवारी पहाटे २ वा.पासुन दर्शनाला सुरूवात झाली.स्थानिक पुजारी, देवस्थानचे देवसेवक, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विधीवत पुजा झाल्यानंतर दर्शनाला सुरूवात झाली. बाहेरून येणारे बाहेरून येणाèया भाविक भक्तांना, पाहूणे मंडळींना, भजनी मंडळींना, वारकरी सांप्रदायिक मंडळे, रथयात्रींना, यात्रेकरूंना, पर्यटकांना, व्यापारी वर्गांना तसेच आजुबाजुच्या व्यqक्तना दि. ११ ते १३ मार्च या दिवशी कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवात सहभागी होता येणार नाही असे आवाहन करण्यात आले होते.ग्रामस्तरावर साध्या पध्दतीने यात्रा असल्याने कुणकेश्वरकडे जाणाèया सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. ११ ते १३ मार्च या यात्रोत्सवाच्या तीन दिवसांच्या कालावधीत कुणकेश्वरमध्ये जाण्यासाठी व कुणकेश्वरमधून बाहेर येण्यासाठी स्थानिक नागरिकांनाही पोलिस यंत्रणेला आधारकार्ड दाखवावे लागत होते.खाकशीमार्गे कुणकेश्वर, तारामुंबरी मिठमुंबरीमार्गे कुणकेश्वर, मिठबांव कातवणमार्गे कुणकेश्वर या तिन्ही मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बॅरिकेट्स लावून नाकाबंदी करण्यात आली होती. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून दर्शन देण्यात येत होते.थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्स अशाप्रकारे भाविकांना दर्शन देण्यात येत होते.कुणकेश्वर मंदीराच्या गाभाèयात प्रवेश न देता भाविकांना केवळ मुखदर्शनाची सोय करण्यात आली होती.दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने गजबजलेला कुणकेश्वर समुद्रकिनाराही यावर्षी सुन्नासुना होता. कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी २०२ पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत यामध्ये २ डीवायएस्पी, २० पोलिस अधिकारी, ८४ अंमलदार, ४८ महिला अंमलदार, २० वाहतुक पोलिस, ३० आरसीपी यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे आचरा गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदीराकडून कुणकेश्वर चरणी आचरा रामेश्वर देवस्थानचे अभिषेकी निलेश सरजोशी यांनी श्री\ळ अर्पण केले. संपुर्ण जग कोरोनामुक्त करून दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या उच्चांकी गर्दीत यात्रोत्सव होवू दे अशी मनोकामना भाविकांनी कुणकेश्वरचरणी व्यक्त केली.

You cannot copy content of this page