बाजारपेठेत सापडलेली दिड तोळ्याची चैन केली पोलिसांच्या स्वाधीन*
*💫सावंतवाडी दि.११-:* समाज्यात आज माणुसकी हरवत चालली असतांना सोनुर्ली येथील नारायण उर्फ अमोल गावडे या युवकाले प्रामाणिकपणा दाखवत सावंतवाडी बाजारात सापडलेली तब्बल दिड तोळ्याची सोन्याची चैन पोलिसाच्या ताब्यात दिली. अमोल यांने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनीही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तर ज्या कोणाची ही चैन असेल त्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात येऊन कागदपत्रासहीत ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांनी केले आहे. सोनुर्ली येथील श्री.गावडे हे गोवा येथे नोकरीला आहेत. ते आपल्या कामानिमित्त सोमवारी ता.8 ला सावंतवाडी शहरात आले होते काम झाल्यावर ते घरी परतत असतांना सायंकाळी साडेपाच वाजता त्यांला नगरपालिका रोडवर चैन सापडून आली. सुरवातीला ती नकली असेल असे समजुन आणि घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने खातरजमा न करता किंवा पोलिसाकडे न जाता ते घरी गेले मंगळवार आणि बुधवार दोन दिवसाचा धार्मिक कार्यक्रम आटपून त्यांनी गुरुवारी सावंतवाडीत येऊन प्रथम सोनाराकडे ती खरी असल्याची खात्री केली, सोनाराने ती सोन्याची असुन त्याची डिझाईन जेलेबी पॅन्थर प्रकारातील असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांने पोलिस ठाणे गाठत घडलेली हकीकत सांगुन सदरची चैन पोलिसांकडे सुपुर्त केली. पोलिस पंचनामा करून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. आज समाज्याज झटपट पैसा कमावण्याच्या नादात चोर्या तसेच चैन स्केचिंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असतांना प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणेही समोर येत आहेत. अमोल यांनी दाखवेली ही प्रमाणिकपणा खरोखरच कौतुस्कास्पद असुन संबधितांने ओळख पटवून सोन्याची चैन पोलिस ठाण्यातुन घेऊन जावी असे आवाहन पोलिस निरिक्षक श्री खोत यांनी केले.
