मनसे संघटना वाढली पाहिजे तर पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे…

संदीप दळवी:मेळावा अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना राज ठाकरे जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही…

⚡कुडाळ ता.३०-: मनसे संघटना वाढली पाहिजे तर गाव तिथे शाखा व पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसेच्या माध्यमातून नक्की प्रयत्न केले जातील, तुम्ही हा मेळावा यशस्वी करून दाखविला त्याची परतफेड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी ग्वाही मनसेचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांनी कुडाळ येथे मनसे कार्यकर्ता मेळाव्यात दिली. कुडाळ येथील ओंकार डिलक्स सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते मेळावा सरचिटणीस संदीप दळवी आणि मनसे कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे आणि राज्य उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्या उपस्थितीत आज आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान हा मेळावा अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला त्यांना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. या मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी व्यासपीठावर राजू साटम, नंदू तळवडेकर, सुरेश शिंदे, श्रिया ठाकुर, मोनिका फर्नांडिस, धीरज परब, श्रेया देसाई, संतोष मयेकर, संतोष शिंगाडे, बाळा पावसकर, घनश्याम परब, पास्कल रॉड्रिग, हेमंत जाधव, ॲड अनिल केसरकर, चंदन दळवी, गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, सचिन सावंत आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याच्या उपस्थितीबाबत प्रमुख मान्यवरांनी कौतुक केले. गाव तिथे शाखा स्थापन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन दळवी यांनी करून येथील सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे. ज्या समस्या असतील त्या वरिष्ठ पातळीवरून सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.
राणे म्हणाले की, या मेळाव्याला गर्दी आहे. याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करून ही गर्दी पाहता भविष्यात मतदानात मतांमध्ये परिवर्तन करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार असून कुडाळ सावंतवाडी, कणकवली येथे मनसेची कार्यालये सुरू करण्यात येतील असे सांगितले. इ-स्टोअर आणि ग्रामीण कोटा फायनान्स यांच्यामार्फत महिला बचतगटांची फसवणूक याकडे काही महिलांनी लक्ष वेधले असता, त्यावर प्रत्येक तालुक्यातून एकत्र येऊन फसवणूक करणाऱ्या संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीच्या घरी जाऊन बसूया. आम्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तुमच्या सोबत असणार आहोत,अशी राणे यांनी दिली. तळवडेकर, मोनिका फर्नांडिस, सुरेश शिंदे, संतोष मयेकर, धीरज परब, अनिल केसरकर, सचिन सावंत व अन्य काही पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळा पावसकर यांनी केले.

You cannot copy content of this page