*💫बांदा दि.१०-:* ‘हात धुवा, मास्क वापरा, राखा अंतर सुरक्षित, …रावांचे नाव शोधते कांझीवरमच्या नक्षीत.” अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित एका मिनिटात बांदा केंद्रशाळेच्या वतीने आयोजित ऑनलाईन उखाणे स्पर्धेत रिना निलेश मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळेत एकत्रित येऊन महिला दिन साजरा करणे अशक्य असले तरी महिला पालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत केंद्रशाळा बांदा नं. १ च्या महिला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे. प्रथम- रिना निलेश मोरजकर, द्वितीय (विभागून)- गौरी नितिन बांदेकर व शुभेच्छा संदीप सावंत. तृतीय; वैशाली सचिन निंबाळकर. उत्तेजनार्थ- वंदना राजेन पाटील. या स्पर्धेचे परीक्षण माधवी गाड (बांदा) व स्वाती पाटील (कास) यांनी केले. या स्पर्धेतील यशस्वी व सहभागी स्पर्धकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक सरोज नाईक, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले असून ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक जे. डी. पाटील, रंगनाथ परब, उर्मिला मोर्ये, रूईजा गोन्सलवीस, रसिका मालवणकर, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस यांनी परिश्रम घेतले.
ऑनलाईन उखाणे स्पर्धेत रिना मोरजकर प्रथम…
