बांदा/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या गौरांग शेर्लेकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच श्री शेर्लेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अर्चना घारे-परब यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या माध्यमातून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने पक्षाच्या कोकण महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी अभिनंदन केले आहे. पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे शेर्लेकर यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी गौरांग शेर्लेकर यांची नियुक्ती…
