युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते अनावरण
⚡कणकवली ता.२५-: कलमठ विभाग युवासेनेतर्फे कणकवली पोलीस स्टेशन परिसर, कलमठ आचरा रोडलगत माणिक चौकालगत, कलमठ सुतारवाडी याठिकाणी बस थांबावर एसटी बसच्या वेळापत्रकाचे कणकवली बसस्थानक प्रमुख प्रदीप परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हे फलक लावण्यात आले आहे. त्याचे अनावरण युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले.
यावेळी कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, ठाकरे सेनेचे कलमठ विभागप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे, ठाकरे सेनेच्या तालुका महिला आघाडीप्रमुख वैदेही गुडेकर, सचिन आचरेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, निसार शेख, विलास गुडेकर, नंदकिशोर कोरगावकर, प्रणय शिर्के, चेतन पाटील आदी उपस्थित होते
कणकवली पोलीस स्टेशन परिसरातील बस स्टॉप लगत असलेल्या माणिक चौक, सुतारवाडी येथील बसस्टॉपवर एसटीच्या बस फेऱ्यांचे वेळापत्रक नसल्यामुळे प्रवाशांना कोणती बस केव्हा येणार आहे. याची माहिती मिळत नसल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन धीरज मेस्त्री यांच्या संकल्पनेतून याठिकाणी बस वेळापत्रकाचे फलक लावण्यात आले आहेत.
