बांदा शहरातील दुर्गामातांचे भव्य मिरवणूकीने तेरेखोल नदीपात्रात विसर्जन…

⚡बांदा ता.२५-: बांदा शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातांचे भव्य मिरवणूकीने तेरेखोल नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.
शहरात गांधीचौक, कट्टा कॉर्नर, आळवाडी, निमजगा येथे नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातांचे पूजन करण्यात आले होते. गेल्या ९ दिवसात विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला व मुलांसाठी विविध स्पर्धाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामुळे शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
काल सायंकाळी उशिरा विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. पारंपारीक ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रात भक्तीपूर्ण वातावरणात दुर्गामातांचे विसर्जन करण्यात आले.

You cannot copy content of this page