देव, देश,आणि संस्कार संपवायला निघालेल्या ठाकरेंचा पक्ष जनताच गाडेल…

कणकवली येथील चौक सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला..

⚡कणकवली ता.१९-: हिंदू सनातन धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्या स्टॅलिन सोबत युती करणारे उद्धव ठाकरे,देव देश,आणि संस्कार संपवायला निघाले आहेत.त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग जिल्हातील जनता गाडल्याशिवर राहणार नाही. असा इशारा कणकवली येथील चौक सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
भारत हा देशातील सर्वाधिक बलाढ्य देश बनविण्यासाठी कमळ समोरील बटन दाबून मोदींना मतदान करायचे.आणि महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कणकवली एसटी स्टँड समोर चौक सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. व्यासपीठावर भाजपा नेते, कुडाळ,मालवण प्रभारी माजी खासदार नीलेश राणे, भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आमदार प्रमोद जठार,माजी आमदार राजन तेली,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला जिल्हाध्यक्षा कोरगावकर ,संपर्क प्रभारी शैलेंद्र दळवी,प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
जगातल्या सर्व देशांनी प्रयत्न केले मात्र चंद्रावर भारताचा तिरंगा फडकताना पाहिला.त्यामुळे मी मोदींनाच माझं पहिल मत देणार असे १९ वर्षाच्या युवकाने मला सांगितले असे सांगताना श्री .बावनकुळे यांनी अनेक उदाहरणे दिली.
370 कलम हटविताना काँग्रेसचे ऐकले नाही आणि हे कलम हटविले.त्यामुळे जनता खुश आहे.शेतकरी म्हणले मोदीनी शेतकरी म्हणून मला 6 हजार दिले. आता शिंदे,फडणवीस,अजित दादा यांचे सरकार 6 हजार देणार आहेत.असे 12 हजार वर्षाला अनुदान देतात. त्यामुळे मोदींना मत देणार. 33 टक्के महिला आरक्षण दिले आहे.त्यामुळे खासदार आमदार महिला होणार आहेत.त्यामुळे महिलांनी मोदींना मतदान देण्याचा संकल्प केलेला आहे. अनेक वर्षे राम मंदिर होवू दिले नाही मात्र मोदींनी हे राम मंदिर उभे केले. अडवाणींनी रथयात्रा काढली तेव्हा मस्करी करायचे.त्यामुळे कोकणातील 50 हजार लोकांना राम लल्लाचे दर्शन घ्यायला जायचे आहे असे आवाहन यावेळी केले.
•साडे तीन लाख घरी पोहोचा
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे रत्नागिरी येथे चिपळून, रत्नागिरी व राजापूर आणि कणकवली येथे कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधला. भाजपाच्या ६०० सुपर वॉरियर्स व कार्यकर्त्यांनी लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख घरी पोहचून मोदींच्या सरकारच्या जनकल्याणकारी योजना व त्यामुळे झालेल्या विकासाची,जनतेला मिळालेल्या लाभाची माहिती द्यावी, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page