मालवण व कुडाळ येथे ‘सागरा प्राण तळमळला’ नाटकाचे प्रयोग..

मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आयोजन

⚡मालवण ता.१९-: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचा प्रयोग उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून दि. २१ ऑक्टोबर रोजी मालवण येथे तर दि. २३ रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. मालवणात हा नाट्यप्रयोग २१ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघ क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील शिवसेना कार्यालयात आज सायंकाळी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मालवण कुडाळ क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, महिला आघाडी जिल्हा उपसंघटक नीलम शिंदे, भारती घारकर, नंदिनी लाड, दिपक मीठबावकर, यश देसाई आदी उपस्थित होते.

श्री श्री बालाजी निर्मित आणि मधुसूदन कालेलकर लिखित ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केले आहे. या नाटकाच्या प्रयोगांना उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच मालवण येथील नाट्यप्रयोगास भाजप नेते निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. नाट्यप्रयोग पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नसून मोफत प्रवेशिका देण्यात येणार आहेत. मालवण शिवसेना शाखा कार्यालय व आचरा येथे राणे शाही हॉटेल मध्ये मोफत प्रवेशिका उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ८६९२९४१२४१ या क्रमांकावर संपर्क साधावा. नाट्यप्रेमी, सावरकर प्रेमी, शाळकरी मुले यांसह सर्वांनी नाट्यप्रयोगाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन बबन शिंदे, राजा गावकर, महेश राणे, नीलम शिंदे यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page