सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जल्लोषात स्वागत
⚡कणकवली, ता.१९-:
घर चलो अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली बाजारपेठेत जनतेशी संवाद साधला.नागरिकांशी हितगुज साधत आ.बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या कामगिरीबद्दल चर्चा केली.
कणकवली येथे ढालकाठी ते केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयपर्यंत भाजपा घर चलो अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी संवाद साधला.यावेळी आम.नितेश राणे, माजी खा.निलेश राणे,माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,बँकेचे संचालक विठ्ठल देसाई,बाबा परब,समीर सावंत,कणकवली तालुका अध्यक्ष श्री संतोष कानडे, माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार,बंडू हर्णे,मिलिंद मेस्त्री,समीर प्रभूगावकर,संदीप मेस्त्री,स्वप्निल चिंदरकर,संजय कामतेकर आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौ-यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक १९ ऑक्टोंबरला सायंकाळी ४.४५ वाजता खारेपाटण येथे दाखल झाले.आमदार नितेश राणे यांनी बावनकुळे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते दाखल झालेले होते. बावनकुळे याच्या स्वागताचा जल्लोष खारेपाटण येथे दुमदुमत आहे. ढोलपथक ,फटाके यांच्या आतिषबाजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार गाजत आहे.या दौ-यात घर चलो अभियान, विधानसभा ३०० कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. खारेपाटण येथे जोरदार स्वागत खारेपाटण येथे स्वागतासाठी रवींद्र शेट्ये,कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, दिलीप तळेकर,रवी पाळेकर, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,भाजप महिला कार्यकर्त्या श्रीम.रत्नप्रभा वळंजू,सौ उज्ज्वला चिके,निशा शेलार, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,कुरगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,नडगिवे सरपंच माधवी मण्यार,माजी सरपंच अमित मांजरेकर,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, इरफान मुल्ला, वायगणी उपसरपंच प्रताप फाटक,खारेपाटण भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,वीरेंद्र चिके,खारेपाटण ग्रा.प.सदस्य अमिषा गुरव ,किरण कर्ले,आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पंचक्रोशीतील अनेक सरपंच, उपसरपंच ,व भाजपा चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कणकवली:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी संवाद साधला.यावेळी आम.नितेश राणे, माजी खा.निलेश राणे,माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,बँकेचे संचालक विठ्ठल देसाई,बाबा परब,समीर सावंत, श संतोष कानडे, रवींद्र जठार,बंडू हर्णे,मिलिंद मेस्त्री व अन्य
