⚡मालवण ता.१९-: मालवण व्यापारी संघाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व महासंघाच्या ३१ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या ३६ व्या वार्षिक व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य साधून मालवण व्यापारी संघातर्फे विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये मालवण व्यापारी संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य ध्यानात घेऊन मालवण व्यापारी संघाचे बोधचिन्ह (लोगो) तयार करणे, मालवण व्यापारी संघाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व महासंघाच्या ३१ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या ३६ व्या वार्षिक व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य ध्यानात घेऊन स्मृतीचिन्हाचे आरेखन (momento design) करणे, ३६व्या व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्याने प्रकाशीत करावयाच्या स्मरणिकेचे मुखपृष्ठ तयार करणे, मालवण व्यापारी संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मालवण व्यापारी संघाचे घोषवाक्य तयार करणे, अशा स्पर्धाचा समावेश आहे. या प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रू. ३,०००, रू. २,०००, रू. १,००० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून स्पर्धकांनी आपले सादरीकरण/संकल्पचित्र/कलाकृती सोबत थोडक्यात स्पष्टीकरणासह हाय रेझ्युलुशन मधे malvanwyaparisangh@gmail.com या ईमेल वर दि.२५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाठवाव्यात. ज्याना आपले सादरीकरण/संकल्पचित्र/कलाकृती या प्रत्यक्षात(हार्डकॅापी)सादर करावयाच्या असतील त्यांनी सहकार्यवाह अभय कदम, २२०सुमती सदन,दैवज्ञ भवन शेजारी, मेढा मालवण, सिंधुदुर्ग ४१६६०६ या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोष्टानेही पाठवता येतील. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून विजेत्यांचा गौरव ३१ जानेवारी २०२४ रोजीच्या मेळाव्यात करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी केले आहे.
