आमदार नितेश राणे यांचे संजय राऊत यांना आव्हान:मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत मोदींवर टीका करत आहे…
⚡कणकवली ता.१९-: ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा उबाठा सेनेचे अनेक नेते जेलमध्ये असतील. त्यामुळे नाशिकमध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्री वर काढावा. कारण ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर आहे. सुशांत सिंग प्रकरणात न्यायालयात कॅव्हेट दाखल करणे याला,”चोर की दाढी मे तिनका म्हणतात” सुशांत सिंग, दिशा सालियानची आत्महत्या होती आणि त्यात आदित्य ठाकरे याचा काही संबध नसेल तर आदित्यला कोर्टात धाव घेण्याची गरज काय ? त्यामुळे लवकरच योग्य माणसाला शिक्षा मिळणार.असा विश्वास भाजप नेते प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
देशाचे पंतप्रधान मोदीनी काल इजराईलच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यावर पवारांनी टीका केली.93 च्या दंगलीच्या काळात दहशदवादी काय करु शकतात हे शरद पवार यांना माहीत असताना फ़क्त मतांसाठी राजकारण करणे योग्य नाही. देशाची आणि जगाची सुरक्षा महत्वाची आहे.हमासने हल्ला केला त्याचा निषेध करताना आम्ही ठाकरे, पवारांना ऐकलं नाही.याचाच अर्थ जिहादी,आणि धर्मांध दहशतवाद्यांना यांचे समर्थन आहे.अप्रत्यक्ष पद्धतीने पाठिंबा देत आहेत. उद्या ओवेसीच्या रॅलीत हे उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून सहभागी झाले तर आश्चर्य वाटणार नाही. येवढे हे मतांसाठी स्वतःचे विचार विसरलेले आहेत.मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत मोदींवर टीका करत आहे. त्याची लायकी नाही.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
टेंबीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे गेलेल्या तेव्हा तिकडचा कूलर,एसी बंद झाला. म्हणून जळफळाट झाला मुळात हा नियतीचा खेळ आहे. 2004 ला रंग शारदामध्ये राणे साहेबांची खुर्ची काढण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. असेच राज ठाकरेंसोबत पण घडलेले.तुमच्या सोबत काल तोच प्रकार ठाण्यात घडला.ह्याला नियतीचा खेळ म्हणतात. माँ साहेबांनी बोललेला नवस उद्धव ठाकरेंनी पूर्ण केला नाही. तर एकनाथ शिंदेनी तो नवस पूर्ण केला.याची आठवण करून दिली.
आरोप झाल्यावर राजीनामा द्यायचा तर सुशांत सिंग मर्डर प्रकरणात आदित्य ठाकरेचा राजीनामा का घेतला नाही.असा थेट सवाल आम. नितेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारला. तर आमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार उबाठा नेत्यांना नाही.अशी टीका केली.
निष्ठावंत काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधींच्या आदेश प्रमाणे लाईटचे बटन सुरू करू नये.जो लाईटच बटन ऑन करेल तो काँग्रेसचा नेता, कार्यकर्ता नाही. तुमचा नेताच म्हणाला आहे.लाईट सुरू केल्यामुळे अदाणीला पैसे जाणार असतील तर काँग्रेसवाल्यांनी लाईट लावू नये आणि राहुल गांधींच्या आदेशाचे पालन करावे.असा टोला लगावला आहे.
