नातेवाईकांना रेल्वे गाडीत बसविण्यासाठी गेले असताना ह्युंदाई आय ट्वेंटी कारने अचानक घेतला पेट…

मळगाव येथील पहाटेची घटना:सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने दुर्घटना टळली; मात्र, गाडी जळून खाक..

⚡सावंतवाडी ता.१९-: स्थानक परिसरात कार पार्क करून नातेवाईकांना रेल्वे गाडीत बसविण्यासाठी गेले असताना ह्युंदाई आय ट्वेंटी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पहाटे ५ च्या सुमारास मळगांवस्थित सावंतवाडी रोड स्थानकात ही घटना घडली. सुदैवाने या वेळी गाडीत कोणी नसल्याने दुर्घटना टळली. मात्र, गाडी जळून खाक झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानकातील फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही गाडी सावंतवाडीतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी उपस्थित रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गाडी पार्क केल्यानंतर गाडीच्या इंजिनच्या भागात वास येत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही आग लागली व काही वेळातच आग भडकली.

You cannot copy content of this page