चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागताचे फलक ठरले लक्षवेधी…

सावंतवाडी शहराच्या वतीने अजय गोंदावळे यांच्याकडून बॅनरबाजी..

⚡सावंतवाडी ता.१९-: भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सायंकाळी सावंतवाडी दाखल होत आहे याच पार्श्वभूमीवर भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावून वातावरण निर्मिती केली आहे.

विधानसभा कार्यालय आणि वाॅर रूमचे उद्घाटन आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या होत आहे. यासाठी ते सावंतवाडी दाखल होत आहेत एकूणच शहराच्या वतीने श्री गोंदावळे यांनी बॅनरमधून त्यांचे स्वागत केले आहे.त्यावर माजी नगराध्यक्ष तथा भाजपा उपाध्यक्ष संजू परब व युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुराहीत यांचे फोटो आहेत. हे बॅनर सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.

You cannot copy content of this page