मुलांवर शालेय अवस्थेत स्वच्छतेचे संस्कार करणे गरजेचे…

विनायक ठाकुर:शालेय मुले ही भारताची संपत्ती..

⚡ओरोस ता.१७-: शालेय मुले ही आरोग्यदायी भारताचा कणा आहे. त्यामुळे या मुलांवर शालेय अवस्थेत स्वच्छतेचे संस्कार करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी जागतिक हात धुवा दिनांचे औचित्य साधुन आयोजित जिल्हास्तरीय उभादांडा केंद्र शाळा १ येथील कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी सरपंच निलेश चमणकर, गटविकास अधिकारी पुनम राणे, गटशिक्षणाधिकारी सतोष गोसावी, केंद्र प्रमुख भागोजी अडुळकर, मुख्याध्यापक गणेश चव्हाण, डॉ. सई लिंगवत, संदिप परुळेकर, अण्णा रेडकर, आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना विनायक ठाकुर यांनी, हात स्वच्छ न धुतल्याने विविध आजाराना सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्याबरोवर आर्थिक तोटा हि सहन करावा लागतो. शालेय मुले हि भारताची संपत्ती आहे. त्याच्यावर या वयात स्वच्छतेचे संस्कार करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन शालेय मुलांसाठी विविध स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत नियोजन करावे अशा सुचना हि त्यानी यावेळी दिल्या. यावेळी शालेय मुलांनी स्वच्छता शपथ घेतली. तर डॉ. सई लिंगवत यानी मुलांना हात धुण्याबाबवचे फायदे व प्रात्याक्षिक करुन दाखविले.

You cannot copy content of this page