विशाल परब: मी कुठलाही स्पर्धक निर्माण करत नाही माझे सर्वांशी चांगले संबंध…
⚡सावंतवाडी ता.१७-: मी कोणतीही निवडणूक किंवा पद मिळवण्यासाठी कार्यक्रम करत नसून एक समाज कार्य म्हणून मी आशा प्रकारचे कार्यक्रम करतो परंतु पक्षाने एकदी संधी दिली तर मी नक्की सोने करेल आशी माहिती भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे केले.
दरम्यान मी कुठलाही स्पर्धेत नाही किंवा माझा कोण स्पर्धकही नाही त्यामुळे माझे सर्वाशी चांगले संबंध असल्याचे ते म्हणाले ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले तुर्तास मला सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच ओळख निर्माण करायची आहे. माझी कोणाशी स्पर्धा नाही, त्यामुळे आमदारकी आणि खासदारकीच्या रेस मध्ये आहे, अशी चर्चा करुन स्वतःच्या माणसांना दुखावणार नाही. माझे राजकीय भवितव्य येणारा काळ ठरवेल. मात्र येणार्या काळात पंचवीस किलोमीटरच्या परिसरात दिड हजारहून अधिक लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आणण्याचा माझा मानस आहे, असा विश्वास भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
श्री परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन विशाल अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने उपस्थित होते. श्री परब पुढे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करण्यामागे विशाल परब यांचा राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे शहरात लागलेले बॅनर व व त्यांनी केलेली भाषणे यातून भविष्यात आमदार किंवा खासदारकीसाठी माझा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे परंतु असा कुठलाही हेतू किंवा स्वार्थ या मागे नसून केवळ आणि केवळ जनसेवा आणि समाजसेवक म्हणून मी पाहत आहे. आपण या आधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथील जनतेला सहजरित्या पाहताना येणारे कार्यक्रम आयोजित केले आहे. भविष्यातही यापेक्षाही कार्यक्रम आयोजित करण्यात परंतु त्यामध्ये माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नसणार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कधीच कार्यक्रम घेतले नाहीत त्यामुळे मी राजकीय स्पर्धेत आहेत असा गैरसमज कुणी करू नये. माझं राजकीय भवितव्य काय असेल हा येणारा काळच ठरवेल.भविष्यात राजकीय पद मिळाल्यास ते स्वीकारायचे की नाही याचा निश्चितच विचार करेन कारण पद स्वीकारल्यास त्याला तितका वेळ देणे आवश्यक आहे. तुर्तास तरी मी उद्योजक असून उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून या जिल्ह्यात आयटी पार्क सारखे उद्योग आणून या जिल्ह्यातील तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले, आपण देश विदेशात फिरत असतो तेथील विविधता पाहता आपला कोकणातही ती विविधता पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे ज्याप्रमाणे गोवा पर्यटनाच्या माध्यमातून स्पर्धा करत आहे ती स्पर्धा येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग ही करेल. ज्या जीवनाच्या वाटचालीमध्ये मी कधीच कोणाला दुखावलं नाही काय मला कोणालाही वाईट बोलायला आवडत नाही समोरून जर मला कोण वाईट बोललं तर ते मी मनावरही घेत नाही व मी कोणालाही स्पर्धक मानत नाही. स्पर्धा ही स्थानिकांशी आपल्या माणसांची नसावी ती बाहेरच्यांशी असावी.
ते पुढे म्हणाले, आठ दिवस विशाल पर्व अभिष्टचिंतन सोहळा हा कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात आला भारतीय जनता पक्ष तसेच विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने यासाठी मेहनत घेण्यात आली आणि म्हणूनच या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आपण आभारी आहोत माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ज्या ज्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कोणतीही राजकारण मला न ठेवता उपस्थिती दर्शवली त्या सर्वांचा आपण आयुष्याच्या शेवटपर्यंत ऋणी राहील. वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार यांनी केलेली मदत आगमनाची होती तसेच या कार्यक्रमाची शान यांनी वाढवली त्या युवक युवतींच्या एकोप्याला सलाम.
गैरसमज करु नका..
सावंतवाडीतील वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राणे कुटुंबातील सदस्य काही कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यामुळे याबाबत कोणीही गैरसमज करू नये आपल्याला राणे कुटुंबियाकडून फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपली वाटचाल असेल.
