दीपक केसरकर, पारपोलीत २० ते २३ ला फुलपाखरू महोत्सव
⚡सावंतवाडी ता.१५-: पारपोली गाव फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित झाले आहे .आता 20 ते 23 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या फुलपाखरू महोत्सवात पारपोलला ु लपाखराचे गाव म्हणून मान्यता देण्यात येणार आहे असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले सिंधू रत्न योजनेतून या महोत्सवाचे आयोजन पार्पोली संयुक्त वन व्यवस्था समिती व वन विभाग सावंतवाडी यांच्या वतीने हे महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
या संदर्भात आढावा घेण्यासाठी केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी ग्रामस्थ, अधिकारी यांची बैठक झाली या बैठकीत उपस्थितांच्या हस्ते फुलपाखरू महोत्सवावर बनवण्यात आलेल्या फलकांचे अनावरण करण्यात आले तर अभिनेते दिगंबर नाईक यांची फुलपाखराच्या गावाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून केसरकर यांनी घोषणा केली केसरकर म्हणाले फुलपाखरू महोत्सव भव्य दिव्य भरवण्यात येणार आहे यासाठी पर्यटकांना निमंत्रण देण्यात आले आहे निसर्गाला हात न लावता फुलपाखराच्या गावाचे दर्शन घेता येणार आहे अनेक फुलपाखरे येथे पाहायला मिळतील फुलपाखरांची माहिती पर्यटकांना देण्यात येईल गावातील 20 ते 25 कुटुंबांकडे पर्यटकांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर फुलपाखराच्या गावाच्या माध्यमातून चमकणार आहे त्यासाठी आवश्यक त्या सुविधा व निधी देण्यात येईल असे केसरकर यांनी स्पष्ट केले या महोत्सवाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार विनायक राऊत वन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत असे केसरकर यांनी स्पष्ट केले यावेळी उपवनसंरक्षक नव किशोर रेड्डी पारपोली सरपंच कृष्णा नाईक उपसरपंच संदेश गुरव प्रियंका गुरव ऋतुजा परब एकनाथ परब प्रमोद परब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, गजानन नाटेकर, आबा केसरकर, नंदु शिरोडकर उपस्थित होते
